गडचिरोलीत जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के, ३.८ रिश्टर स्केल तीव्रता

शुक्रवारी मध्यरात्री १२.४५ वाजताच्या सुमारास हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं

    गडचिरोली : गडचिरोलीतुन एक मोठी बातमी समोर येत आहे. गडचिरोलीत भुकंपाचे धक्के जाणवल्याची बाब समोर आली आहे. सिरोंचा तालुक्यातील उमानूर ते झिंगानूर हे भूकंपाचं केंद्रबिंदू होतं. रिश्टर स्केलवर ३.८ भूकंपाची तिव्रता मोजण्यात आली.

    शुक्रवारी मध्यरात्री १२.४५ वाजताच्या सुमारास हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, सुदैवाने यात कोणतेही नुकसान झाले नाही.