गोकुळवर दूध उत्पादकांचा मोर्चा ; गाय दूध दरात कपात केल्याने शेतकरी आक्रमक

गायीच्या दूधाची दरवाढ झालीच पाहिजे, अशा घाेषणा देत मंगळवारी (िद. ०३) गोकुळ दूध उत्पादकांनी गोकुळ दूध संघ कार्यालयावर मोर्चा काढला. गाेकुळ संघाने गाय दूध दरात कपात केल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या आंदाेलनाप्रसंगी पाेलीसांचा गाेकुळ परिसरात मोठा बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता .

    कोल्हापूर : गायीच्या दूधाची दरवाढ झालीच पाहिजे, अशा घाेषणा देत मंगळवारी (िद. ०३) गोकुळ दूध उत्पादकांनी गोकुळ दूध संघ कार्यालयावर मोर्चा काढला. गाेकुळ संघाने गाय दूध दरात कपात केल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या आंदाेलनाप्रसंगी पाेलीसांचा गाेकुळ परिसरात मोठा बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता .

    कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने म्हैस दूध खरेदी दरात वाढ केल्याची माहिती नुकतीच अध्यक्ष अरुण डाेंगळे यांनी दिली. त्यानूसार म्हैस दूध ५.५ फॅट ते ६.४ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रुपये १ ने दूध खरेदी दरात वाढ झाली आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिच्या पुढील दुधास प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे दूध खरेदी दरात वाढ झाली आहे. गोकुळ मातृसंस्था अाहे. ही संस्था टिकावी म्हणून मोर्चा काढतोय. तत्काळ दर पूर्ववत केले नाही तर आमच्याकडे दुसरे पर्याय खुले असल्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी यावेळी दिला.

    रविवारपासून दरवाढ लागू
    दुध पुरवठा करणाऱ्या जिल्हा व जिल्ह्याबाहेरील दुध उत्पादकांना रविवारपासून (दि. १ ऑक्टोबर) ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. दरम्यान गाय दूध खरेदी दरात २ रुपये कपात केल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.या नाराजीतून गोकुळ दूध उत्पादकांनी  गोकुळ कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी माेर्चेकरांनी गायीच्या दुधाचे दर पूर्ववत करा अन्यथा अमूल मध्ये जाण्याचा इशारा प्रशासनास दिला आहे.