उंब्रज येथे रस्त्यावर दूध ओतून दूधउत्पादक शेतकऱ्यांनी केले आंदोलन

दुधाचे दर घसरले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाला असून मंगळवारी उंब्रज ता.कराड येथील बाजारपेठेतील रस्तावर दूध ओतून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दुधाला दर मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलकांनी बाजारपेठेत ठिय्या मांडला व दुधाने भरलेली कॅन रस्तावर ओतून देण्यात आली.

    उंब्रज : दुधाचे दर घसरले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाला असून मंगळवारी उंब्रज ता.कराड येथील बाजारपेठेतील रस्तावर दूध ओतून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दुधाला दर मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलकांनी बाजारपेठेत ठिय्या मांडला व दुधाने भरलेली कॅन रस्तावर ओतून देण्यात आली.किसान सभेचे नेते अजित नवले यांनी महाराष्ट्रभर दूध आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत शेतकरी दूध उत्पादक संघटनेच्यावतीने मंगळवारी उंब्रज येथे निदर्शने करण्यात आली.

    कॅप्टन इंद्रजीत जाधव,सुरेश पाटील पेरलेकर,अमित पाटील, शैलेश यादव, कृष्णत जाधव, पोपट कोळेकर यांच्यासह शेकडो दुध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी बाजार पेठेत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

    कॅप्टन इंद्रजीत जाधव म्हणाले, सरकारच्या दुटप्पी भूमिकेमुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आला. दूध दरावर सरकारची भूमिका ठाम नाही. दुधाला ३४ रुपये दर शासणाने यापुर्वी मान्य केला आहे मात्र सध्यस्थितीत डेरी मालक २८ रुपये दर देत आहे. वास्तविक ३८ रुपये दर दुधाला देणे आवश्यक आहे. मात्र सरकारच्या ३४ रुपयांतही घोटाळा होत असून दूध उत्पादकांना प्रत्यक्षात २८ रुपयेच मिळतात यावर शासणाचा अंकुश नाही. त्यामुळे किसान सभेचे नेते अजित नवले यांनी महाराष्ट्रभर दूध आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा राज्यभरातील शेतक ऱ्यांचा पाठींबा असून शेतकरी दूध उत्पादक संघानेही या आंदोलनात उडी घेतली असून दूध दराबाबत योग्य निर्णय न झाल्यास संपूर्ण सातारा जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार असून यास सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचा इशारा जाधव यांनी दिला.