खटावमधून लाखो नागरिक जाणार! दहिवडीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची जय्यत तयारी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर चळवळ उभारणारे मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी (दि. २०) दहिवडी (ता. माण) येथे जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी खटाव तालुक्यातून लाखो समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती खटाव तालुका समन्वयक विजय शिंदे यांनी िदली.

    वडूज : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर चळवळ उभारणारे मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी (दि. २०) दहिवडी (ता. माण) येथे जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी खटाव तालुक्यातून लाखो समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती खटाव तालुका समन्वयक विजय शिंदे यांनी िदली. यावेळी बाबा फडतरे, डॉ. संतोष गोडसे, नीलेश गोडसे, बाबा शिंदे, अनिल पवार, दत्तू काका घार्गे, अभय देशमुख,प्रशांत जाधव,सचिन फडतरे, नीलेश गोडसे, भरत जाधव, बाळासाहेब पोळ, दिलीप मांडवे, विजय गोडसे, अमोल गोडसे, राजेंद्र माने उपस्थित हाेते.

    मराठा समाजाच्या आरक्षणाचा गेली अनेक वर्ष प्रलंबित राहिलेला विषय जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाने पुन्हा समोर आला. त्यामुळे सरकार जागे झाले असून आरक्षण अंतीम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या चळवळीला मूर्त स्वरुप येण्यासाठी राज्यभर समाज बांधवांच्या भेटीसाठी करण्यासाठी जरांगे-पाटील सभा घेत आहेत. त्याचाच भाग म्हणुन शुक्रवारी दहिवडी (ता. माण) येथे सभा होत आहे. त्यासाठी खटाव तालुक्यातून लाखो मराठा बांधव उपस्थित राहणार असून, त्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावागावात घरोघरी जाऊन जागृती करण्यात येत आहे.जरांगे पाटील पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे या सभेला उपस्थित राहून प्रत्येकाने या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    राजकारणापेक्षा समाज महत्त्वाचा
    राजकारणात अडकून पडलेल्या समाज बांधवांची आजवर अनेक पक्षांनी आपली फसवणूक केली आहे.  त्यामुळे राजकारणाचे जोडे काढून बांधवांनी समाज केंद्रस्थानी ठेवून निधड्या छातीने सभेला हजर राहण्याचे आव्हान समन्वयकांनी केले