
पुणे स्वारगेटहून चिपळूणला बस निघालेली होती. बसमधून चालकासह १२ व्यक्ती प्रवास करत असताना वरंध घाटाजवळील शिरगावजवळ चालकाचे बस गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस (एमएच ०८ एपी १५३०) ६० फूट खोल दरीत कोसळली.
पाचगणी : पुण्याहून चिपळूणला निघालेल्या १७ सिटर मिनी बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस ६० फूट खोल दरीत कोसळली. वरंधा घाटातील शिरगाव जवळ रविवारी (दि. ८) पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये बसचालकाचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.
अजिंक्य संजय कोलते (वय ३०) असे मृत्यू झालेल्या बस चालकाचे नाव अाहे. राजेंद्र लाला मिसाळ (रा. पद्मावती पुणे), रमेश तुकाराम महाडिक (रा. पुणे) सुभाष सीताराम कदम (रा. पुणे) करिष्मा उत्तम कांबळे (रा. सिंहगड पुणे) जखमी झाले. त्यांना भोर येथील उपजिल्हा रुग्णालायात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले.
पुणे स्वारगेटहून चिपळूणला बस निघालेली होती. बसमधून चालकासह १२ व्यक्ती प्रवास करत असताना वरंध घाटाजवळील शिरगावजवळ चालकाचे बस गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस (एमएच ०८ एपी १५३०) ६० फूट खोल दरीत कोसळली. घटनेनंतर बस चालक दरीतून वर आला व त्याने स्थानिक हॉटेल मालक दत्ता पोळ, अक्षय धुमाळ, भीमा पोळ, संतोष पवार यांना माहिती दिली. दरम्यान अपघातात जखमींपैकी चालक अजिंक्य संजय कोलते (रा. धनकवडी पुणे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पाटील करीत आहेत.
शिरगावचे तरुण मदतीला धावले
शिरगावच्या या तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन अधांरात असलेल्या बसला प्रथम दोरीने बांधले व त्यानंतर अपघातग्रस्त गाडीतीतील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढून भोर पोलीस स्टेशनला कळवले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी भोर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील, पोलिस दत्तात्रय खेंगरे,चेतन कुंभार, अतुल मोरे, सुनिल चव्हाण यांच्यासह सह्याद्री रेस्क्यु टीमचे सचिन देशमुख व इतर जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातामधील सर्व व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले.