हनुमान चालिसा वाचणे जर गुन्हा असेल तर मी १४ वर्षे शिक्षा भोगण्यास तयार आहे. तरी देखील मी पुन्हा उभी राहीन. यापुढे माझा लढा सुरुच राहणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना माझे आव्हान आहे की त्यांनी माझ्याविरोधात कुठेही निवडणूक लढवून दाखवावी आणि जिंकून दाखवावे, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंना दिले आहे.
बीड : खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान दिले होते. दरम्यान आता याच आव्हानाला मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वीकारले आहे. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन अमरावती ला जाऊन निवडणूक लढेल असं वक्तव्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी बीड मध्ये केलंय. नवनीत राणा या चाराण्या सारख्या गोष्टी करू लागल्या आहेत. त्या मोठ्या डोंगराला आव्हान देत असून नवनीत राणा यांना बोलण्यासाठी काही तरी विषय पाहिजे म्हणून ते असे बोलत असल्याचं मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.