संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

ओबीसी नेते तथा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केला आहे. यावरून मराठा समाज आक्रमक झाला असून भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हीच बाब लक्षात घेता, पोलिसांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    मुंबई : ओबीसी नेते तथा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केला आहे. यावरून मराठा समाज आक्रमक झाला असून भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हीच बाब लक्षात घेता, पोलिसांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
    मंत्री छगन भुजबळ यांच्या पोलीस सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. भुजबळांच्या सुरक्षेत असलेल्या पोलिसांनी अलर्ट राहावं, असे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.
    जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका
    मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांची बीडमध्ये ‘निर्णायक इशारा सभा’ पार पडली. या सभेत जरांगे-पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. “एकदा आरक्षण मिळूदे तुला हिसकाच दाखवतो. खूप दिवस झालं तुझी फडफड चालू आहे,” असा एकेरी उल्लेख करत जरांगे-पाटलांनी भुजबळांना लक्ष्य केलं होतं.