कोळसा पुरवठा बाबत केंद्र सरकार जबाबदार – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

फक्त महाराष्ट्र शासनाला दोष देण्यापेक्षा केंद्र शासनाने कोळशाचे नियोजन या ठिकाणी तर व्यवस्थित केलं. तर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये हे संकट टळेल. त्यामुळे आंबेडकर साहेबांचा मी आदर करतो पण त्यांनी संपूर्ण माहिती घेऊन जर बोलले असते तर अधिक बरे झाले असते. असेही ते म्हणाले.

    नाशिक : कोळसा पुरवठा बाबत केंद्र सरकार जबाबदार असून केंद्र सरकारने कोळशाचे नियोजन करावे अशी प्रतिक्रिया ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.  येवला येथून जात असताना शासकीय विश्रामगृह येथे थांबले असताना त्यांनी याविषयी संवाद साधला.

    ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे येवला येथून जात असताना शासकीय विश्रामगृह येथे थांबले असता यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले असता की, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी असे वक्तव्य केले की, महाराष्ट्र वर आलेला ऊर्जा संकट हे महाविकास आघाडीचा अपयश असून महाविकास आघाडीचे सरकारच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावे. याबाबत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना विचारले असता. ते म्हणाले की आंबेडकर साहेबांचा मी आदर करतो. पण त्यानी जरा संपूर्ण माहिती घेऊन यावर खरे बोलणे अपेक्षित आहे. हे फक्त महाराष्ट्र वरती आलेले संकट नाही आहे. हे देशभरामध्ये सगळीकडे कोळशाचा तुटवडा केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे देशभर आलेले संकट आहे. फक्त महाराष्ट्र वरत आलेलं नाही आहे. आपण जर शेजारच्या राज्यात देखील जर परिस्थिती बघितली गुजरात असेल कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा अगदी उत्तर प्रदेश सगळीकडे लोडशेडिंग मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. फक्त महाराष्ट्र शासनाला दोष देण्यापेक्षा केंद्र शासनाने कोळशाचे नियोजन या ठिकाणी तर व्यवस्थित केलं. तर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये हे संकट टळेल. त्यामुळे आंबेडकर साहेबांचा मी आदर करतो पण त्यांनी संपूर्ण माहिती घेऊन जर बोलले असते तर अधिक बरे झाले असते.