राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता नाही – राज्यमंत्री रावसाहेब दानवे

अजून संधी हवी असेल तर विचार करता येईल असं म्हणत दानवे यांनी 2 ते 3 दिवसांतच राज्यात सत्ता स्थापनेचे संकेत दिले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता देखील दानवे यांनी फेटाळून लावली

    जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचे संकेत दिले आहे. आज रावसाहेब दानवे आणि आरोग्य मंत्री राजेश  टोपे यांच्या उपस्थितीत जालना शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयाच भूमिपूजन करण्यात आलं. ‘जालना जिल्ह्यात जे कामं करायचे असेल ते लवकर करून टाका, राज्य सरकारचे थोडे दिवस उरले असून ‘मी फक्त 2 ते 3 दिवस विरोधी पक्षात आहे.’ असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राजेश टोपे यांना उद्देशून  केलं.

    अजून संधी हवी असेल तर विचार करता येईल असं म्हणत दानवे यांनी 2 ते 3 दिवसांतच राज्यात सत्ता स्थापनेचे संकेत दिले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता देखील दानवे यांनी फेटाळून लावली. तसेच शिंदे गटाशी युती करायची की नाही याबाबत भाजपचे राज्यातील नेते निर्णय घेतील असंही दानवे यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची गुजरातमध्ये कोणतीही भेट झाली नाही असंही दानवे म्हणाले. मात्र आमच्या पक्षाच्या बैठका जरी सुरू असल्या तरी राज्यातील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत असंही दानवे यांनी नमूद केलं. राष्ट्रवादी कायदेशीर लढाई त्यांच्या पद्धतीने लढणार असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे असंही दानवे म्हणाले.