
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. त्यांच्या या घोषणेनंतर आज मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी त्यांची भेट घेतली.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. त्यांच्या या घोषणेनंतर आज मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी त्यांची भेट घेतली.
राजकारणातून बाहेर पडण्याच्या निर्णयाची माहिती निलेश राणे यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करुन दिली होती. त्यांच्या या निर्णयानंतर रविंद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अडीच ते तीन तास चर्चा झाल्याची माहिती दिली जात आहे. या चर्चेनंतर हे दोन्ही नेते एकाच गाडीतून भाजपचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या बंगल्यावर गेले आहेत. आता या नेत्यांमध्ये चर्चा होणार असून, त्यानंतरच निलेश राणे त्यांचा निर्णय कायम ठेवतात की काही बदल करतात हे दिसणार आहे.
दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निलेश राणे हे खासदार म्हणून लोकसभेत गेले होते. त्यांचे वडील नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुले भाजपमध्ये असताना काल निलेश राणे यांनी बाहेर पडण्याचे जाहीर केले.