uday samant

हेल्मेट सक्ती बाबतीत आता पुण्याप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यामध्येही निर्णय घेतले जाणार आहेत. मंत्री उदय सामंत यांनी हेल्मेट सक्ती बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे(Minister Uday Samant's big decision regarding helmet compulsion).

    हेल्मेट सक्ती बाबतीत आता पुण्याप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यामध्येही निर्णय घेतले जाणार आहेत. मंत्री उदय सामंत यांनी हेल्मेट सक्ती बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे(Minister Uday Samant’s big decision regarding helmet compulsion).

    हेल्मेटसक्तीच्या बाबतीमध्ये मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक आरटीओचे प्रमुख आणि ट्रॅफिक प्रमुख, यांच्या सोबत बैठक घेतली. पुण्यामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला तसाच निर्णय रत्नागिरीमध्ये घ्यावा अशा सूचना सामंत यांनी केली आहे.

    हेल्मेटचा वापर मध्ये फक्त प्रबोधन केलं जाईल सक्ती केली जाणार नाही. अशा पद्धतीचे परिपत्रक चार तारखेपर्यंत द्यावे अशा पद्धतीचे परिपत्रक निघाले नाही तर राजेश देशमुख जिल्हाधिकारी पुणे यांनी जे परिपत्रक वापरला आहे त्याच प्रमाणे रत्नागिरीतील शहरातल्या जनतेला दिलासा मिळावा अशा पद्धतीचे आदेश उदय सामंत यांनी बैठकीत दिले.

    जर राज्याच्या एका जिल्ह्यामध्ये एका शहरांमध्ये जिल्हाधिकारी अशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकतात आणि ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा आहेत या शहरांमध्ये स्वतंत्र होऊ शकतो तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये हा निर्णय होणे गरजेचे आहे असल्याचे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले.