Union Minister Nitin Gadkari inaugurates three-day National Conference

गडकरी म्हणाले की, आमदार, खासदार, मंत्री खूप होतात. पण जे होतात, ते आपल्या मुलाबांळाचा विचार करतात. बायकोला तिकीट द्या, मुलाला तिकीट द्या, ड्रायव्हरला तिकीट द्या. कोणी समाजाची उन्नती केल्याचे मला काही फार दिसून आले नाही. काही लोकांनी केली असेल यात काही अपवाद असतील.

    नागपूर – आमदार, खासदार, मंत्री खूप होतात; पण ते बायको, मुलगा, ड्रायव्हर अन् चमच्यालाच तिकीट मागतात, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा तुफान टोलेबाजी केली. नागपूर आदिवासी विभागाकडून आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे आवाहनही केले.

    गडकरी म्हणाले की, आमदार, खासदार, मंत्री खूप होतात. पण जे होतात, ते आपल्या मुलाबांळाचा विचार करतात. बायकोला तिकीट द्या, मुलाला तिकीट द्या, ड्रायव्हरला तिकीट द्या. कोणी समाजाची उन्नती केल्याचे मला काही फार दिसून आले नाही. काही लोकांनी केली असेल यात काही अपवाद असतील.

    गडकरी पुढे म्हणाले की, आजच्या काळात क्वॉलिटीशिवाय पर्याय नाही. राजकारणातही क्वॉलिटी पाहिजे आणि खाण्यातही क्वॉलिटी पाहिजे. क्वॉलिटी चांगली असेल तर मार्केट आणि मार्केट मिळाले की पैसा मिळाला. तसेच बांबूचे उत्पादन घेण्याचे आवाहन त्यांनी केले. बांबू आता ग्रास असून कापण्यास परवानगी आहे. माझ्या ऑफिसमध्ये सर्व सोफे बांबूपासून बनलेले असल्याचे त्यांनी सांगितले.