‘मी एचआयव्ही पॉझिटिव्ह, कधीही तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत’, मीरा रोड हत्याकांड प्रकरणी आरोपी मनोज सानेचा नवा खुलासा

प्राथमिक चौकशीदरम्यान, आरोपी मनोज सानेने पोलिसांना सांगितले की, तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असून तो उपचार घेत आहे.

    संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या मुंबईतील मीरा रोड हत्याकांड प्रकरणी (Mira road Murder Case)  नवे नवे खुलासे होत आहे. आरोपी मनोज साने (Manoj Sane) याने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वतीने 3 ते 4 दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती, असा खळबळजनक खुलासा केला होता. तिने आत्महत्या केल्याने घाबरून गेल्याचं त्यान सांगितलं होतं. आता मनोजने पुन्हा नवी माहिती दिली आहे. त्याने पोलिसांना सांगितले की तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. त्याने कधीही त शारीरिक संबंध ठेवले नाहीत. कारण ती त्याच्या मुलीसारखी होती.

    2008 पासून एचआयव्ही पॉझिटिव्ह

    प्राथमिक चौकशीदरम्यान, आरोपी मनोज सानेने पोलिसांना सांगितले की, तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असून तो उपचार घेत आहे. 2008 मध्ये त्याला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समजले,” तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनेक वर्षापुर्वी उपचारादरम्यान झालेल्या अपघातानंतर संक्रमित रक्ताच्या वापरामुळे त्याला हा आजार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, त्याने कधीही सरस्वतीसोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत. कारण ती त्याच्या मुलीसारखी होती. एका पोलीस अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला ही माहिती दिली.

    तिने आत्महत्या केली –  आरोपी

    आरोपीने  चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले की सरस्वतीने आत्महत्त्याद केली. तिने आत्महत्या केल्याने आपण घाबरून जाऊन हे सगळं केल्याचं तो म्हणाला.  सरस्वतीच्या आत्महत्येला आपल्यालाच जबाबदार धरलं जाईल, याची भीती वाटत असल्याचं त्याने म्हटलं. त्यामुळेच तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना तयार केली. झाड कापण्याच्या कटरने तिच्या मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे केले. त्यानंतर तिचे तुकडे कुकरमध्ये उकळून भाजले. त्याची पावडर करून  सोसायटीच्या मागच्या नाल्यात फेकून दिल्याचा खुलासा मनोजने केला आहे.

    16 जूनपर्यंत पोलीस कोठडी

    पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत तातडीने तपास करत आरोपी मनोज साने याला अटक केली. आज आरोपीला ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी सरकारी पक्षाने पोलीस कोठडीची मागणी केली. कोर्टाने आरोपीला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.