मिरजेत मध्यरात्री हॉटेलचं पाडकाम, गोपीचंद पडळकर यांच्या भावावर गंभीर आरोप, गुन्हे दाखल झाले नाहीत तर… स्थानिकांनी दिला इशारा

सांगलीतील मिरज मध्ये मध्यरात्री पाडकाम करण्यात आलं. मध्यरात्री दोन वाजता एसटी स्टॅन्डजवळ हे पाडकाम करण्यात आलं आहे. या पाडकामावर स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे.

    मिरज : सांगलीतील मिरज मध्ये मध्यरात्री पाडकाम करण्यात आलं. मध्यरात्री दोन वाजता एसटी स्टॅन्डजवळ हे पाडकाम करण्यात आलं आहे. या पाडकामावर स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. भाजपचे विधान परिषदेतेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्या विरोधात स्थानिक आक्रमक झाले आहेत.

    सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आमचे आमदार आहेत. त्यांनी जाहीर करावं की या कृत्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे का? जर खाडे यांचा या प्रकरणाशी संबंध नसेल तर गोपीचंद पडळकर, ब्रम्हानंद पडळकर आणि त्यांच्यासोबत आलेले दीड-दोन हजार गुंड या सगळ्यांवर योग्य त्या कलमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करतो”, असं स्थानिक नागरिकांची मागणी आहे. जर आज दुपारी 12 वाजेच्या आधी या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही सगळे लोक आमच्या कुटुंबासह सुरेश खाडे यांच्या कार्यालयाबाहेर उपोषण करू, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

    दरम्यान या सगळ्या प्रकरणवर आम्ही गोपीचंद पडळकर यांच्याशी फोनवरून बातचित केली. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मिरजेत दुकानं पाडण्यात आली आहेत. ते पाडकाम कायदेशीर आहेत, असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी फोनवरून सांगितलं.