राज्यसभेच्या वेळी जी चूक झाली ती पुन्हा होणार नाही, सोमवारी महाराष्ट्र चमत्कार बघेल – अजित पवार

राज्यसभेच्या निवडणुकीवेळी (Rajya sabha election) जी काही चूक झाली ती यावेळी होणार नाही, मत बाद होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. तसेच विधानपरिषदेच्या निवडणुकीतही (MLC Election) चमत्कार घडेल, पण तो कोणाच्या बाजून घडेल हे सोमवारी महाराष्ट्राची जनता (Maharashtra Public) पाहिल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

    मुंबई : नुकत्याच राज्यसभा निवडणुका (Rajya sabha election) झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) रणनिती आखायला तसेच मतांची जुळवाजुळव करण्याची तयारी सुरु झाली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 10 seat) रिंगणात उतरल्याने 20 जूनला (सोमवारी) निवडणुकीचा (MLC Election on 20 June 2022) आखाडा रंगणार आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगणार असून, क्रॉस व्होटिंग (Cross Voting) तसेच घोडबाजार किंवा दगाफटका होऊ नये, यासाठी सर्वंच पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे. तसेच अपक्षांच्या मनधरणीसाठी भाजपा तसेच मविआ (BJP and MVA) कामाला लागली आहे.

    दरम्यान, आज उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी (NCP Leader Ajit Pawar press conference) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्दांना हात घातला. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी (Rajya sabha election) जी काही चूक झाली ती यावेळी होणार नाही, मत बाद होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. तसेच विधानपरिषदेच्या निवडणुकीतही (MLC Election) चमत्कार घडेल, पण तो कोणाच्या बाजून घडेल हे सोमवारी महाराष्ट्राची जनता (Maharashtra Public) पाहिल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच दोघांना मतदानास कोर्टाकडून परवानगी नाही. भाजपचे दोन आमदार गंभीर आजारी असल्याने ते मतदान करतील की नाही माहित नाही. त्यामुळे २८४ सदस्यांकडून मतदान होईल. त्यात तर २६ चा कोटा निर्माण होईल. २६ चा आकडा जो गाठायला कमी पडेल त्याची विकेट पडेल असंही अजित पवार म्हणाले.

    सध्या अपक्ष आमदारांची जमवाजमव करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे अपक्षांना काहींनी फोन केलेत हे खरंय. अपक्षांची गरज सगळ्यांनाच आहे. बहुजनविकास आघाडीच्या नेत्यांना सर्व उमेदवार जाऊन भेटत आहेत. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असं अजित पवार म्हणाले. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. (Ajit pawar on vidhan parishad election in press conference)