udhav thackrey

सध्या गुहावटीत एकनाथ शिंदे यांच्याजवळ शिवसेनेचे ३७ आमदार असल्यामुळे मविआत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज संध्याकाळी वर्षा (Varsha) या शासकीय निवासस्थानी बैठक घेणार आहेत. या बैठकीला शिवसेनेचे १८ आमदार तर ४ खासदार (18 MLA and 4 MP) उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

    मुंबई : विधान परिषद निवडणुकीत (MLC Election 2022) मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुरतमध्ये (Surat) एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्यानंतर ते बुधवारी मध्यरात्रीपासून जवळपास आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. त्यानंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, आमदारांना मुंबईत येऊन चर्चा करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

    दरम्यान, सध्या गुहावटीत एकनाथ शिंदे यांच्याजवळ शिवसेनेचे ३७ आमदार असल्यामुळे मविआत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज संध्याकाळी वर्षा (Varsha) या शासकीय निवासस्थानी बैठक घेणार आहेत. या बैठकीला शिवसेनेचे १८ आमदार तर ४ खासदार (18 MLA and 4 MP) उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. अजय चौधरी (शिवडी), राहुल पाटील (परभणी), संतोष बांगर (हिंगोली), भास्कर जाधव (गुहागर), रवींद्र वायकर (जोगेश्वरी), संजय पोतनीस (कलिना), कैलास पाटील (उस्मानाबाद), उदयसिंह राजपूत (औरंगाबाद) आणि उदय सामंत (रत्नागिरी), सुनील प्रभू (मालाड), राजन साळवी (राजापूर), प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), सुनील राऊत (विक्रोळी), वैभव नाईक (कुडाळ-मालवण), आदित्य ठाकरे (वरळी), रमेश कोरगावकर (भांडुप), कैलास पाटील (पाचोरा), नितीन देशमुख (बाळापूर) असे एकूण शिवसेनेचे १८ आमदार बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

    तर राहुल शेवाळे (मुंबई दक्षिण मध्य), गजानन किर्तीकर (मुंबई – उत्तर पश्चिम), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद) आणि अरविंद सावंत (दक्षिण मुंबई), असे एकूण शिवसेनेचे ४ खासदार बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. या बैठकीतून कोणत तोडगा निघतो का, किंवा बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी कोणती रणनिती आखली जाते हे पाहवे लागेल.