शोभा बाबर
शोभा बाबर

खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल कलजेराव बाबर यांच्या पत्नी शोभा अनिल बाबर ( वय ६२ ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. या दु:खद बातमीमुळे संपूर्ण विधानसभा मतदारसंघावर शोककळा पसरली. सायंकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी पुत्र नगरसेवक अमोल व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास यांनी मुखाग्नी दिला.

  विटा : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल कलजेराव बाबर यांच्या पत्नी शोभा अनिल बाबर ( वय ६२ ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. या दु:खद बातमीमुळे संपूर्ण विधानसभा मतदारसंघावर शोककळा पसरली. सायंकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी पुत्र नगरसेवक अमोल व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास यांनी मुखाग्नी दिला. अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपस्थिती लोकांच्या अश्रुंचा बांध फुटला.

  दरम्यान, विटा येथील निवासस्थानी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर पाच वाजता गार्डी येथील निवासस्थानी आणण्यात आले. गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.
  मागील पंधरा दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी ( ता. ३) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

  आमदार बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर आजारी असल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रुग्णालयात उपचारादरम्यानत त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, मंगळवार ( ता. २ ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी दीनानाथ रुग्णालयात अनिल बाबर यांची भेट घेतली होती. यावेळी शिंदे यांनी बाबर यांच्याकडे त्यांच्या पत्नीच्या तब्यतेची विचारपूस केली होती.

  शोभा बाबर यांचे माहेर सातारा जिल्ह्यातील आर्वी येथील आहे. दत्तात्रय जाधव – पाटील यांची कन्या होत्या. १९७६ साली अनिलराव बाबर यांच्याशी लग्न झाले.त्यावेळी बाबर हे गार्डी हे गावचे सरपंच होते. आमदार बाबर यांच्या राजकीय जीवनातील जड उताराच्या शोभा काकी या साक्षीदार होत्या.त्यांच्या मागे मुलगा नगरसेवक अमोल , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास , पती अनिल बाबर यांच्या सुना , नातवंडे , पुतणे , दीर असा परिवार आहे.

  अत्यंसंस्कारास आमदार महेश कदम , माजी आमदार सदाशिवराव पाटील, विशाल पाटील , पृथ्वीराज पाटील , अविनाश पाटील , शांताराम कदम , डॉ. जितेश कदम , वैभव पाटील , बाबासाहेब मुळीक, सुशांत देवकर, प्रतापराव पाटील , विजय पाटील ( येळावी ) , संजय मोहिते , यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

  शुक्रवारी रक्षाविसर्जन
  विटा – मायणी रस्त्यावरील जीवनप्रबोधिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन शुक्रवार ( ता. ५ ) सकाळी नऊ वाजता होणार आहे.

  शासकीय पुष्पचक्र 
  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजानिधी , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जितेंद्र डुडी , जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम , तहसीलदार ऋषिकेत शेळके , गटविकास अधिकारी संदीप पवार यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

  विटा शहर बंद 
  आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा यांच्या निधनाची वृत्त समजताच विटा शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवून श्रध्दांजली वाहण्यात आली.