MLA Ashek Pawar demands that plastic flowers be banned
MLA Ashek Pawar demands that plastic flowers be banned

  पुणे : प्लास्टीकच्या फुलांवर बंदी घालावी, या मागणीसाठी आगामी विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे आमदार अशाेक पवार यांनी येथे स्पष्ट केले आहे. शेतकी महाविद्यालयाच्या मैदानावर आयाेजित ‘हाॅर्टीप्राेइंडीया’ या फुलाेत्पादन, बागायती प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बाेलत हाेते.

  या प्रदर्शनातून  कृषी क्षेत्रात मोठी व्यवसायाची संधी

  जर्मनी, नेदरलॅंड, बांगलादेश, इंडाेनेशिया, नेपाळ आदी परदेशी कंपन्या सहभागी असलेल्या या प्रदर्शनातून  कृषी क्षेत्रात मोठी व्यवसायाची संधी निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन, असोसिएशन ऑफ एन्वायरमेंटल हॉर्टीकल्चर यांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयाेजन केले गेले आहे.

  या मान्यवरांची उपस्थिती

  उद्घाटनप्रसंगी सोनिया अग्रवाल, कोंजेटी, श्रद्धा रासने, असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत चौधरी, सेक्रेटरी आनंद कांचन,  वसंत रासने व विजय रासने, विश्वास  जोगदंड, संतोष शितोळे, बापू सुरवसे, उदय पाटील, महिपाल राणा आदी उपस्थित होते.

  प्लास्टिकच्या फुलांचा सजावटीमध्ये वापर

  आमदार पवार म्हणाले, सध्या प्रत्येक सणांमध्ये सर्रासपणे प्लास्टिकच्या फुलांचा सजावटीमध्ये वापर केला जात आहे. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचत आहे. जशी सरकारने प्लास्टिक बंदी केली तशीच त्या प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्यात यावी. यासाठी मी येत्या अधिवेशनाच्या लक्षवेधीमध्ये हा विषय मांडणार आहे.

  सर्व स्तरांतून मागणीचे प्रमाण वाढले

  हॉर्टीकल्चर क्षेत्रामध्ये वैविधता आल्याने सर्व स्तरांतून मागणीचे प्रमाण वाढले आहे. हे प्रदर्शन फ्लोरिकल्चर, नर्सरी आणि ग्रीनहाउस टेक्नॉलॉजी, हॉर्टिकल्चरल प्रॉडक्ट्स, फार्म मशिनरीज आणि प्रोसेसिंग अँड पोस्ट हार्वेस्ट टेक्नोलॉजी बराेबरच फुले, फळे, भाज्यांची रोपे, औषधी वनस्पती आणि सजावटीचे रोपे, आंतरराष्ट्रीय फुले तसेच हायड्रोपोनिक्स, सौरऊर्जेचे तंत्रज्ञान, प्लांट टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि ग्रीनहाउस तंत्रज्ञान याची माहिती या प्रदर्शनातून मिळेल, असे रासने यांनी नमूद केले आहे.