आमदार अश्विनी जगतापांनी केली अपघातग्रस्त महिला अन् चिमुकल्यांना मदत; स्वत:च्या गाडीतून नेले रुग्णालयात

अश्विनी लक्ष्मण जगताप यांना माई या नावाने पिंपळे गुरव परिसरात ओळखले जाते. त्याच आमदार माईंनी अपघातग्रस्त कुटुंबाला मायेचा हात पुढे करत स्वतः च्या गाडीतून रुग्णालयात नेले. आमदार जगताप यांच्या मदतीमुळे त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडले.

    पिंपरी : चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या मायेचा प्रत्यय पिंपरी चिंचवडकरांना बघायला मिळाला. अश्विनी लक्ष्मण जगताप यांना माई या नावाने पिंपळे गुरव परिसरात ओळखले जाते. त्याच आमदार माईंनी अपघातग्रस्त कुटुंबाला मायेचा हात पुढे करत स्वतः च्या गाडीतून रुग्णालयात नेले. आमदार जगताप यांच्या मदतीमुळे त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडले. त्या पिंपळे सौदागर रस्त्यावरून जात असताना महिला आणि तिच्या दोन लहान मुलांचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

    तात्काळ त्यांनी गाडी थांबून त्यांची विचारपूस केली. लहानग्याला पाणी देखील पिण्यास विचारले. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नावाप्रमाणेचं आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप या त्यांच्या मदतीला धावून गेल्या. तातडीने त्यांना स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली.

    शहरामध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते आणि याचं वाहतूककोंडीचा फटका अपघातग्रस्त महिला आणि मुलांना बसला. ऐनवेळी आमदार अश्विनी जगताप या मदतीला धावून आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.