बच्चू कडूंची मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पुन्हा नाराजी; मुख्यमंत्र्यांनी अखेर सांगितलंच…

राज्य मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) कधी याकडे शिंदे गटासह भाजपच्या नेतेमंडळींचेही डोळे लागले आहेत. पण सरकार स्थापन झाल्यापासून एकदाच मंत्रिमंडळ विस्तार झाला (Maharashtra Politics) आहे.

    मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) कधी याकडे शिंदे गटासह भाजपच्या नेतेमंडळींचेही डोळे लागले आहेत. पण सरकार स्थापन झाल्यापासून एकदाच मंत्रिमंडळ विस्तार झाला (Maharashtra Politics) आहे. दुसरा विस्तार अद्याप बाकी आहे. असे असताना शिंदे-फडणवीस सरकारमधील मित्रपक्ष नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यात आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मंत्रिमंडळ विस्ताबाबत आपली नाराजी पुन्हा बोलून दाखवली.

    मंत्रिपदाकडे अनेक इच्छुक आमदारांचे लक्ष लागले आहे. त्यावर बच्चू कडू म्हणाले, ‘मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल अजून काही खरं दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांची बैठक घेतली पाहिजे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्पष्टता झाली पाहिजे. कारण विस्तारावरून बऱ्याच आमदारांमध्ये संभ्रम सुद्धा निर्माण झाला आहे.

    भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये उत्सुकता

    मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. शिंदे गटातील आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू हेही मंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन स्पष्ट करायला हवं, असे आमदार कडू यांनी म्हटले आहे.

    मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

    राज्य मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार याची माहिती त्यांनी दिली नाही.