bachchu kadu

आमदार बच्चू कडू म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारला दिलासा मिळाला. कोणाचंही निलंबन झालेलं नाही.निलंबनाचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षाला द्यावा लागेल. हे सरकार अध्यक्षांनीच बनवलं आहे. त्यामुळे आता वेगळा निर्णय लागणार नाही. ऑपरेशनमध्ये काही चुका झाल्या तरी पेशंट वाचला हे महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

  अमरावती: बहुप्रतिक्षित सत्तासंघर्षाच्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं सरकार वाचलं आहे. सत्ता संघर्षाच्या काळात घडलेल्या अनेक बाबींबाबत आक्षेप व्यक्त केले असतानाही, शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) जीवनदान दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं शिंदे सरकारचा मार्ग मोकळा झाल्याचं निरीक्षणही सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे. (Maharashtra Political Crisis) या निर्णयानंतर आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

   न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारला दिलासा
  आमदार बच्चू कडू म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारला दिलासा मिळाला. कोणाचंही निलंबन झालेलं नाही.निलंबनाचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षाला द्यावा लागेल. हे सरकार अध्यक्षांनीच बनवलं आहे. त्यामुळे आता वेगळा निर्णय लागणार नाही.

  राज्यपालांचं चुकलं पण…
  ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंकडे आमदार व खासदारांची संख्या जास्त आहे. जो निर्णय झाला आहे तो संख्याबळावर झाला आहे. त्यामुळे सरकार अधिक मजबुतीने काम करेल. राज्यपालांचं काही चुकलं असेल. मात्र ऑपरेशनमध्ये काही चुका झाल्या तरी पेशंट वाचला हे महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

  ताशेरे ओढले तरी शिंदे गटाला दिलासा
  या सगळ्यात राज्यपाल आणि एकनाथ शिंदे यांच्यावर ताशेरे मारण्यात आले असले, तरी आता सरकारला कोणताही धोका नसल्याचं समोर आलंय. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार अपात्रतेचा आणि प्रतोदपदाच्या निर्णयाची जबाबदारी असेल. निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेनेची मान्यता दिली असल्यानं आता प्रतोद कोण असणार, यावरुन वाद होऊ शकतो. या सगळ्या स्थितीत शिंदे सरकारला जीवनदान मिळालंय हे मात्र सध्या दिसतंय.