आमदार बच्चू कडू बॅकफूटवर… राज्यातील पाच जागांपैकी फक्त एकच जागा बच्चू कडू लढवणार, काय म्हणाले बच्चू कडू?

दवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यातील पाच जागेपैकी फक्त एकच जागा बच्चू कडू लढवणार आहेत, त्यामुळं आमदार बच्चू कडू यांची तलवार म्यान झाली आहे. औरंगाबाद शिक्षक मतदार संघासाठी डॉ. संजय तायडे असणार उमेदवार असणार आहे.

    अमरावती : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक (Election) जाहीर झाली आहे. यासाठी १२ जानेवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यापूर्वी भाजपाने (BJP) या जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने कोकण शिक्षक मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पुन्हा एकदा तिकीट दिलं आहे. तर औरंगाबाद (Aurangabad) शिक्षक मतदारसंघातून किरण पाटील उमेदवार देण्यात आली आहे. सोबतचं अमरावती पदवीधरमधून पुन्हा विद्यमान आमदार रणजीत पाटीस यांना संधी दिली आहे.

    आमदार बच्चू कडू बॅकफूटवर…

    तर दुसरीकडे पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यातील पाच जागेपैकी फक्त एकच जागा बच्चू कडू लढवणार आहेत, त्यामुळं आमदार बच्चू कडू यांची तलवार म्यान झाली आहे. औरंगाबाद शिक्षक मतदार संघासाठी डॉ. संजय तायडे असणार उमेदवार असणार आहे. अमरावतीसह इतर चारही जागेवरील उमेदवारी अर्ज घेणार माघारी घेतली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने सोबत निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव फेटाळून लावल्याने बच्चू कडू नाराज झाले होते. दरम्यान, बच्चू कडू यांच्या माघारीचे कारण अपष्ट आहे, त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.

    महाविकास आघाडीचं काय?

    महाविकास आघाडीनेही पाच पैकी अद्याप तीनच जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. यात औरंगाबाद शिक्षकसाठी राष्ट्रवादीने विक्रम काळेंना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर कोकणमध्ये शेकापकडून बाळाराम पाटील हे मविआचे उमेदवार असणार आहेत. नाशिक पदवीधरसाठी सुधीर तांबेंना पुन्हा एकदा काँग्रेसचं तिकीट मिळालं नाही. अमरावती आणि नागपुरच्या जागेचा मविआत अजून निर्णय नाही. निवडणूक जाहीर झालेल्या ५ सदस्यांची मुदत ७ फेब्रुवारी २०२३ रोजी संपणार आहे. यात राष्ट्रवादी १, भाजप १, काँग्रेस १ आणि दोन अपक्ष सदस्यांचा समावेश आहे.