आमदार भरत गोगावले यांना ग्रामपंचायत निवडणुकीत धक्का, गोगावलेंची ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे

या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतात यावरून कोणाची किती ताकद हे दिसणार आहे. दरम्यान, आता या निवडणुकांचा निकाल लागण्यास सुरुवात झाली असून, भाजप-शिंदेगट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे वर्चस्व पणाला लागले आहे. रायगडमधील शिंदे गटाचे आमदार भरत गोगावाले (MLA Bharat Gogavle) यांना ग्रामस्थांनी धक्का दिलाय. गोगावलेंना पराभवाचा धक्का बसला आहे.

    रायगड : राज्यात १ हजार ७९ ग्रामपंचायत निवडणुकीचे (Gram Panchayat Election) काल मतदान झाले होते. राज्यातील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायतीचा निकाल आज लागत आहे. या निवडणुकीत एकूण ७४ टक्के मतदान झालं होतं. राज्यात सत्तांतरानंतर पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक होत असल्यामुळं सर्व पक्षासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतात यावरून कोणाची किती ताकद हे दिसणार आहे. दरम्यान, आता या निवडणुकांचा निकाल लागण्यास सुरुवात झाली असून, भाजप-शिंदेगट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे वर्चस्व पणाला लागले आहे. रायगडमधील शिंदे गटाचे आमदार भरत गोगावाले (MLA Bharat Gogavle) यांना ग्रामस्थांनी धक्का दिलाय. गोगावलेंना पराभवाचा धक्का बसला आहे.

    दरम्यान, गोगावले यांच्या काळीज खरवली ग्रामपंचायतीत पराभवाला सामोरी जावे लागले आहे. ही ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे गेली आहे. येथे शिंदे गटाच्या सरपंचपदाच्या उमदेवाराचा पराभव झाला. काँग्रेस समर्थक चैतन्य महामुनकर हे विजयी झाले आहेत. या पराभवामुळं शिंदे गटाला हा धक्का मानला जातो. कारण भरत गोगवले हे सध्या शिंदे गटातील आघाडीचे नेते असून, विधानसभेत शिंदे गटाचे प्रतोदही आहेत. त्यामुळं त्यांना हा धक्का मानला जात आहे.