MLA Bharat Gogawale | एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ४८ आणि ८ अपक्ष आमदार - आमदार भरत गोगावलेंची राज्यपालांना भेटण्याची तयारी | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव्ह ब्लॉग
अंतिम अपडेटJune, 23 2022

एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ४८ आणि ८ अपक्ष आमदार – आमदार भरत गोगावलेंची राज्यपालांना भेटण्याची तयारी

द्वारा- Sadhana
सब एडिटर
15:12 PMJun 23, 2022

जे आमदार महाराष्ट्राबाहेर आहेत त्यांनी महाराष्ट्रात यावं : संजय राऊत

मुंबई : जे आमदार महाराष्ट्राबाहेर आहेत  त्यांनी महाराष्ट्रात यावं. सोशल माध्यमातून भूमिका न मांडता प्रत्यक्ष मुंबईत या. उद्धव ठाकरेंना भेटा. तुमची भूमिका मांडा तुमच्या भूमिकेचा विचार केला जाईल असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

मविआ मधून बाहेर पडाव यासाठी आधी मुंबईत या. आपण पक्के शिवसैनिक आहोत. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे. आधी तुम्ही २४ तासात परत या. उद्धव साहेबांसोबत बसून भूमिका मांडा असेही राऊत पुढे म्हणाले.

रोहन शिंदे,महाड : शिवसेनेच्या (Shivsena) ४८ आमदारांसह आठ अपक्ष आमदार असे पन्नास आमदार आमच्याबरोबर असल्याची माहिती एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक शिवसेनेचे प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले (MLA Bharat Gogawale) यांनी आज सकाळी महाडमधील पत्रकारांशी फोनवरून बोलताना दिली. सर्व काही व्यवस्थित चालले आहे, लवकरच आम्ही राज्यपालांना भेटू अशी माहितीही त्यांनी दिली.

आमदार भरत गोगावले हे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गुवाहाटी (Guwahati) येथे आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर पक्षाच्या मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी टाकल्याने आमदार गोगावले यांचे राजकीय महत्व वाढले आहे. आज सकाळी त्यांच्याशी संपर्क साधला असता, ४८ सेना आमदारांसह ५० आमदारांचा आम्हाला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही पक्ष सोडणार नाही, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आम्ही घेतली असल्याचे आमदार गोगावले यांनी सांगितले.

मुंबईत केव्हा परतायचे याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आपण मुख्य प्रतोद असल्यामुळे राज्यपालांना भेटण्यासाठी आपणही एकनाथ शिंदे यांच्यासमवेत मुंबईत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत केव्हा जायचे याचे नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

eknath shinde banner

महाडमध्ये लागले समर्थनाचे बॅनर
दरम्यान, आ.भरत गोगावले यांनी नामदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर, गेले दोन दिवस महाडमधील शिवसैनिकांमधून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र आज महाड शहरात युवा सनेने आ. एकनाथ शिंदे आणि आमदार भरत गोगावले यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावल्याचे पहावयास मिळाले. युवा सेनेचे द. रायगड जिल्हा अधिकारी विकास गोगावले हे देखील आज गुवाहाटी येथे जाण्यासाठी मुंबईतून रवाना झाल्याची माहिती आहे. आ. गोगावले हे देखील स्थानिक सेना पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं संभ्रम निर्माण होतोय का?

View Results

Loading ... Loading ...
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.