दसरा मेळाव्याबाबतच्या कोर्टाच्या निर्णयानंतर भरत गोगावलेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Dasara Melava) कुणाचा? हा सामना उद्धव ठाकरे यांनी जिंकला आहे. शिवाजी पार्कसाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने उच्च न्यायायलामध्ये धाव घेतली होती. आज यावर उच्च न्यायालयात शिंदे गट, उद्धव ठाकरे आणि बीएमसीकडून युक्तिवाद झाला.

    मुंबई: शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) दसरा मेळाव्याबाबत (Dasara Melava) ठाकरे गटाच्या बाजूने निकाल लागला आहे. ठाकरे गटाला २ ते ६ ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्क वापराची परवानगी मिळाली आहे. (Shivsena) हायकोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य असल्याची प्रतिक्रिया यावेळी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी दिली आहे. त्याशिवाय आम्ही आमचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर घेऊ, ते त्यांचा दसरा मेळावा घेतील, असेही गोगावले म्हणाले.

    शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा? हा सामना उद्धव ठाकरे यांनी जिंकला आहे. शिवाजी पार्कसाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने उच्च न्यायायलामध्ये धाव घेतली होती. आज यावर उच्च न्यायालयात शिंदे गट, उद्धव ठाकरे आणि बीएमसीकडून युक्तिवाद झाला. सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं शिंदे गटाचे सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली आहे. त्याशिवाय उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. उद्धव ठाकरे यांच्या गटाचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे.

    कोर्टानं दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. शिवाजी पार्कसाठी ते कोर्टात गेले होते, आम्हाला कोर्टानं दिलेला निकाल मान्य आहे. काळजी करण्याचं कारण नाही. आमचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होईल. आम्ही आमची तयारी सुरु केली आहे. आमचा कार्यक्रम होईल, त्यांचा ते करतील, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी दिली.

    शिवाजी पार्कसाठी आम्ही प्रयत्न केला. पण कोर्टाच्या निकालाचा आम्ही आदर करतो. आम्हाला वादविवाद करायचे नाहीत, आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडायचे आहेत. आम्ही मागणी केली होती, आम्हाला परवानगी मिळाली असती तर आम्ही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतला असता. पण आता आम्ही बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेऊ. बीकेसी मैदानही बाळासाहेब ठाकरे यांच्या घराच्या जवळच आहे, असे गोगावले म्हणाले.