मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्यानिमित्त सावद्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली बैठक

राज्यातील लोकांच्या समस्या मार्गी लावणे बाबत तात्कालीन मुख्यमंत्री व नवीन मुख्यमंत्री यांच्यात काय काय व किती फरक आहे.याचे उदाहरण दिले. तसेच आपण अधिक संख्येने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला उपस्थित राहून मी सांगितलेल्या बाबींचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. आपला तालुका व परिसरात ६४ टक्के व्यवसाय हे केळीवर चालते.

    सावदा : येत्या २० सप्टेंबर २०२२ रोजी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. तरी या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे. म्हणून मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि.१७ सप्टेंबर रोजी सावदा येथे कोचूर रोडावरील गणपती मंदिरात बैठक घेण्यात आली. या ठिकाणी शेतकरी वर्ग,कार्यकर्ते व हित चिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    सुरुवातीला आमदार चंद्रकांत पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार माजी नगरसेवक फिरोज खान पठाण, माजी नगरसेवक शाम आकोले यांनी केले. यानंतर अनेक वर्षांपासून न सुटलेल्या मतदारसंघातील प्रत्येक सामाजातील लोकांच्या व शेतकरी वर्गाच्या रस्ते, पाणी, गटारे इत्यादी समस्या भरभरून निधी देवून कमी वेळात बऱ्यापैकी कशा प्रकारे सोडविण्यात येतील हे चंद्रकांत पाटील यांनी मार्गी लावले. याचे अनुभव उपस्थितांना सांगितले. तरी आपल्या आशा कार्यसम्राट आमदारांचे हात अधिक बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने मुख्यमंत्र्यांच्या सभेत सर्वांनी हजर राहण्याचे आवाहन देखील केले.

    यावेळी अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील लोकांच्या समस्या मार्गी लावणे बाबत तात्कालीन मुख्यमंत्री व नवीन मुख्यमंत्री यांच्यात काय काय व किती फरक आहे.याचे उदाहरण दिले. तसेच आपण अधिक संख्येने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला उपस्थित राहून मी सांगितलेल्या बाबींचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. आपला तालुका व परिसरात ६४ टक्के व्यवसाय हे केळीवर चालते. म्हणून केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आलेल्या विविध प्रकारच्या आसमानी संकटांमुळे हवालदिल शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात शासकीय स्तरावरून कसा दिलासा व मदत करता येईल.

    तसेच रोजगारासाठी एमआयडीसी, मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री होण्याऐवजी हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात यावा इत्यादी प्रश्न थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण मांडणार आहोत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सावद्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी उर्फ बद्री, किशोर पाटील मोठा वाघोदा, समाजसेवक गजू ठोसरे, संजू मिस्तरी, सह कार्यकर्ते शेतकरी व हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.