मंत्रिपद देतो म्हणून आमदारांची लाखो रुपयांची फसवणूक; ‘या’ आमदारांची…, आरोपीना पोलिसांकडून…

भाजपातील काही आमदारांना फोन करुन आरोपी नीरज सिंह राठोड पैशांची मागणी केली. तसेच आपण भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP President J. P. Nadda) यांच्या जवळचे असून, त्यांच्या मर्जीतले आहोत, त्यामुळं तुम्हाला मंत्रिपद मिळेल.

    नागपूर : महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकीय क्षेत्रातून एक खळबळ माजवणारी बातमी समोर येत आहे. आपण अजूनपर्यंत आमदारांनी पैसै घेतल्याचं किंवा लाच मागितल्याचे ऐकले आहे. मात्र आता चक्क आमदारांना मंत्रिपद देतो म्हणून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अटक केली आहे. नीरज सिंह राठोड असं या आरोपीचं नाव आहे. त्याला गुजरातच्या (Gujrat) मोरबीमधून (Morbi) अटक करण्यात आली आहे. त्यामुळं आश्चर्य व्यक्त केले जात असून, या आमदारांनी पक्षश्रेष्ठींशी संपर्क न साधता पैसे कसे काय दिले? असा सवाल उपस्थित केला आहे.

    जे. पी. नड्डांच्या नावाचा वापर…

    दरम्यान, भाजपातील काही आमदारांना फोन करुन आरोपी नीरज सिंह राठोड पैशांची मागणी केली. तसेच आपण भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP President J. P. Nadda) यांच्या जवळचे असून, त्यांच्या मर्जीतले आहोत, त्यामुळं तुम्हाला मंत्रिपद मिळेल, असं आरोपीने नड्डा यांच्या नावाचा गैरवापर करत होता. असं फसवणूक झालेल्या आमदारांनी सांगितले आहे. नागपूरमध्यचे भाजप आमदार विकास कुंभारे यांच्याशी देखील या भामट्यानं सात मे रोजी संपर्क साधला होता. धक्कादायक म्हणजे काही आमदारांनी या भामट्याच्या दाव्यांना सत्य मानून त्याला लाखोंची रक्कम दिल्याचीही माहिती आहे. मात्र या गोष्टीला अद्याप पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र आमदारांनी कोणतीही शहानिशा न करता पैसे दिल्याने आश्यर्च व्यक्त करण्यात येतंय.

    कोट्यवधी रुपयांची मागणी…

    महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी मिळवून देतो, असं सांगून कोट्यवधी रुपयांची मागणीही केली. तसेच काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देतो, असं आमिष दाखवत त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, कुंभारेंना संशय आला, आणि त्यांनी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. अशी कुठलीही व्यक्ती नड्डांच्या जवळची नाही, असं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांत याप्रकरणी लेखी तक्रार दिली. यानंतर नागपूर पोलिसांनी या भामट्याला गुजरातमधील मोरबीमधून काल (16 मे) रात्री उशिरा ताब्यात घेतलं असून त्याचं नाव नीरज सिंह राठोड आहे. यात आणखी कोणाच्या समावेश आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करताहेत.