
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) हे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना येत्या एक-दोन दिवसांत नोटीस पाठवणार आहेत.
मुंबई – राज्यातील सत्तानाट्यावर लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने मागील वर्षी शिवसेनेतून बंड केल्यानंतर ठाकरे गटाने १६ आमदार अपात्रेसाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. यानंतर वर्षभरानंतर कोर्टानं हा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, असं म्हटलं होतं. यानंतर मागील आठवड्यात यावर सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाकडे पुरेसे कागदपत्र नसल्यानं दोन आठवड्यानंतर सुनावणी होईल, असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे. मात्र या प्रकरणी लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) हे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना येत्या एक-दोन दिवसांत नोटीस पाठवणार आहेत. (mla disqualification case verdict soon a notice will be sent to the shinde group and the thackeray group from the assembly speaker)
दोन्ही गटांना नोटीस पाठवणार…
दरम्यान, आमदार अपात्र प्रकरणी लवकर निर्णय घ्यावा, असं सर्वोच्य न्यायालयाचे सरन्यायाधीस धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना निर्देश दिले आहेत. यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त करताना, एवढा विलंब का लागतोय. लवकर निर्णय द्या असं सरन्यायाधीस धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आता मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) हे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना येत्या एक-दोन दिवसांत नोटीस पाठवणार आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कायदेतज्ज्ञ आणि विधीमंडळाच्या सचिवालयाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली, त्यानंतर दोन्ही गटाच्या प्रमुखांना नोटीसा पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीसाठी दोन्ही गटांच्या पक्षप्रमुखांनी आपली बाजू एक-दोन आठवड्यात मांडण्याबाबत या नोटीसा बजावण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.