khadse vs fadnavis

देवेंद्र फडणवीस वैयक्तिक पातळीवर उतरत असून हा त्यांचा बालीशपणा आहे. त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवायला हवी. वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा आपल्या कर्तव्याला महत्व द्यावे, असा सल्ला खडसे यांनी दिला.

    जळगाव: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज खालच्या पातळीवर बोलत असले तरी त्यांच्या पक्षात अनेक वर्षे मीच मालक होतो. असं वक्तव्य आमदार एकनाथ खडसे  (Eknath Khadse) यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

    काय म्हणाले होते फडणवीस?
    आमदार एकनाथ खडसे यांनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर आज त्यांच्यावर आम्हाला काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती. त्यांना आता नवीन मालक मिळाला आहे. ते मालक सांगतात तसंच ते करतात, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर जळगावातील आगमनावेळी टीका केली. या टीकेचा खडसे यांनी जोरदार समाचार घेतला.

    मी नालायक होतो तर माझ्या हाताखाली काम का केलं? खडसेंचा सवाल
    देवेंद्र फडणवीस वैयक्तिक पातळीवर उतरत असून हा त्यांचा बालीशपणा आहे. त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवायला हवी. वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा आपल्या कर्तव्याला महत्व द्यावे, असा सल्ला खडसे यांनी दिला. ते ज्या पक्षात आहे, त्या पक्षात असताना मी त्यांचा मालक होतो. काही वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केले. त्यावेळी अजित पवार त्यांचे मालक होते का? असा सवाल त्यांनी केला. मी जर नालायक होतो तर इतके वर्ष तुम्ही माझ्या हाताखाली काम का केले असा सवालदेखील त्यांनी केला.

    एकनाथ खडसे यांनी अंगात काळा ड्रेस घालून केला सरकारचा निषेध
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा आकाशवाणी चौकातून जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले.
    यामुळे जळगावात वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होत. एकनाथ खडसे यांनी अंगात काळा ड्रेस घालून सरकारचा निषेध केला.