पक्ष कसा चालवावा हे पवारांकडून शिका; राजेश क्षिरसागर यांची टीका

बंडखोरी केल्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. नवाब मलिक आणि दाऊद प्रकरणावरून बोलता येत नव्हते, असेही राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. मात्र, त्यांची मुळ खदखद आता बाहेर पडली आहे. पोटनिवडणुकीला त्याग करूनही माझी राज्यसभेला आठवण झाली नाही, असे ते म्हणाले.

    मुंबई : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात शिवसेनेला (Shivsena) खिंडार पडले आहे. आमदार प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर हे बंडखोर शिंदे गटाला (Shinde Group) जाऊन मिळाले. त्यानंतर खासदारांनी केलेल्या बंडाळीनंतर संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि धैर्यशील मानेसुद्धा (Dhairyashil Mane) शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

    राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी बंडखोरी केल्यानंतर हिंदुत्वाचा (Hindutwa) मुद्दा उपस्थित केला होता. नवाब मलिक आणि दाऊद प्रकरणावरून बोलता येत नव्हते, असेही ते म्हणाले. मात्र, त्यांची मुळ खदखद आता बाहेर पडली आहे. पोटनिवडणुकीला (By-Election) त्याग करूनही माझी राज्यसभेला आठवण झाली नाही, असे म्हणत संजय पवार यांना उमेदवारीला विरोध होता, हे आता त्यांनी अप्रत्यक्षरित्या जाहीरपणे सांगून टाकले आहे. ज्यांची जनतेतून निवडून यायची लायकी नाही त्यांनीच पक्ष संपवल्याची टीका त्यांनी केली, असेही ते म्हणाले. तसेच, आम्ही शिवसेना प्रमुखांना सोडले नाही आणि सोडणार नाही. पण, पक्ष कसा चालवावा हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून शिकावे, अशी टीका त्यांनी केली.