आमदार, उद्योगासह आता मंत्रिमंडळ देखील गुजरातला नेले, आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टिका

आजची राज्य  मंत्रिमंडळाची होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. यावर शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. राज्यातील प्रश्नांबाबत मंत्रिमंडळ बैठक गरजेची आहे. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांकडे राज्यातील प्रश्नांसाठी वेळ नाही, मात्र ते आपलं राज्य सोडून गुजरात राज्यात प्रचारासाठी  व्यस्त आहेत, अशी खोचक टिका आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

    मुंबई – युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. मी तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची भेट घेणार असून, आम्ही दोघेही एकाच वयाचे आहोत. त्यांचंही काम चांगलं सुरू आहे. पर्यावरणासह इतर विषयांवर चर्चा करणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी त्यांनी आजची राज्य  मंत्रिमंडळाची होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. यावर शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. राज्यातील प्रश्नांबाबत मंत्रिमंडळ बैठक गरजेची आहे. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांकडे राज्यातील प्रश्नांसाठी वेळ नाही, मात्र ते आपलं राज्य सोडून गुजरात राज्यात प्रचारासाठी  व्यस्त आहेत, अशी खोचक टिका आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

    दरम्यान, पुढे बोलताना  आदित्य ठाकरे म्हणाले की, आधी आमदार नेले, मग उद्योग नेले आणि आता तर मंत्रिमंडळ घेऊन गेले आहेत, त्यामुळं या सरकारला राज्यातील मूळ प्रश्नांने काही देणं घेण नाही, मात्र गुजरात महत्त्वाचा वाटतो. राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,  ओला दुष्काळ, बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था आदी प्रश्न आहेत, पण सरकार मात्र गुजरातमध्ये व्यस्त आहे. मंत्री प्रचारासाठी गुजरातला गेलेत याचं दुःख नाही. पण महाराष्ट्रातही मंत्रिमंडळ बैठक व्हायला हवी, असं आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सीबीआयने दिशाचा मृत्यू अपघातीच होता असं म्हटलंय, यावर बोलताना घाणेरड्या राजकारणात मी जाऊ इच्छितच नाहीत. मला चिखलात मला पडायचं नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.