आमदार कैलास पाटील यांचं उपोषण मागे

    उस्मानाबाद : शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा २०२० चा पीक विमा मिळावा तसेच अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळावं या मागणीसाठी गेल्या सहा दिवसापासून ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) उपोषणाला बसले होते. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस होता. दरम्यान, उपोषण मागे घेण्यासंदर्भात रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कैलास पाटील यांच्याशी संवाद साधला आहे. याबाबत विमा कंपनीशी बैठक घेऊ, तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे पैसे लवकरात लवकर देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती कैलास पाटील यांनी दिली आहे. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आमदार कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे.

    उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या मेनी व्हाव्यात या मागणीसाठी आमदार कैलास पाटील हे मागील ६ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले होते. वीमा कंपनीकडून उस्मानाबाद जिल्ह्याला १२०० कोटी रुपये येणे असून, या प्रमुख मागणीसाठी कैलास पाटील यांचे उपोषण सुरु केले होते. दरम्यान त्यांच्या याच उपोषणाला अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी देखील पाठींबा दिला होता.