आमदार कैलाश गोरंट्याल यांचा त्या आमदारांना टोला

जालना विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailash Gorntyal) यांची मतदानाची वेळ आली. यावेळी त्यांनी सभागृहात एक शेर म्हणत शिवसेनेतून बंड करून फुटलेल्या आमदारांना चांगलाच टोला लगावला.

    मुंबई (महेश पवार) : राज्य विधिमंडळाच्या (Legislative Assembly) विशेष दोन दिवसीय अधिवेशनात (Session) सकाळी अकरा वाजता विधानसभा अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम सुरु झाला. भाजपकडून (BJP) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) तर शिवसेनेकडून (Shivsena) राजन साळवी (Rajan Salvi) हे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

    उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झालेल्या या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आवाजी पद्धतीने मतदानाचा हक्क बजावला. राहुल नार्वेकर यांच्या बाजूने एकनाथ शिंदे गट, भाजप आणि अपक्ष मिळून १६४ इतके मतदान झाले. सत्ताधारी पक्षाचे मतदान झाल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्या समर्थनासाठी महाविकास आघाडीचे आमदार यांनी मतदान सुरु केले. आवाजी मतदान सुरु होते. अजित पवार यांनी सर्वप्रथम राजन साळवी यांच्याबाजूने मतदान केले.

    जालना विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailash Gorntyal) यांची मतदानाची वेळ आली. यावेळी त्यांनी सभागृहात एक शेर म्हणत शिवसेनेतून बंड करून फुटलेल्या आमदारांना चांगलाच टोला लगावला. तो शेर असा होता…

    कैसे कैसे ऐसे वैसे हो गये
    ऐसे वैसे कैसे कहा इधर उधर गये