कोरेगाव विधानसभा मतदार संघातील बहुतांशी ग्रामपंचाय तीवर आमदार महेश शिंदे यांचे वर्चस्व

कोरेगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत च्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये सरासरी 85 टक्के मतदान झाले. कोरेगाव तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीपैकी बोरिव, कन्हेर खेड, चोरगेवाडी, बोबडेवाडी, मुगाव, शिरढोण या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. यापैकी बोबडेवाडी, शिरढोण या ग्रामपंचायती आमदार महेश शिंदे यांच्या ताब्यात गेल्या.

    कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत च्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये सरासरी 85 टक्के मतदान झाले. कोरेगाव तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीपैकी बोरिव, कन्हेर खेड, चोरगेवाडी, बोबडेवाडी, मुगाव, शिरढोण या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. यापैकी बोबडेवाडी, शिरढोण या ग्रामपंचायती आमदार महेश शिंदे यांच्या ताब्यात गेल्या. तर कनेर खेड ची महत्त्वाची ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली.

    कोरेगाव तालुक्यातील तडवळे, आसरे, भाटमवाडी ,चांदवडी, आणि वेलंग, चौणेश्वर या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. सोमवार दिनांक सहा सहा नोव्हेंबर रोजी मतमोजणी कोरेगाव तहसील कार्यालयात पार पडली.

    या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कोरेगाव विधानसभा मतदार संघातील तडवळे ,भाटमवाडी ,बुध, पुसेगाव, शिरढोण, काटेवाडी, नवलेवाडी, मुगाव,अंअं बोबडेवाडी या ग्रामपंचायतीवर आमदार महेश दादा शिंदे यांच्या गटाने विजय संपादन केला. तर वेलंग आसरे ,चांदवडी, या पुनर्वशीत गावच्या ग्रामपंचायती आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाला मिळाल्या . सातारा तालुक्यातील कोडोली ग्रामपंचायत सरपंच पदी आमदार महेश दादा शिंदे यांच्या विचाराचा सरपंच निवडून आला.

    कोरेगाव तालुक्यातील तडवळे गावची निवडणूक चुरशीची झाली. या निवडणुकीत चाळीस वर्षे अभाधिक असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आमदार महेश दादा शिंदे यांच्या गटाने उलथून टाकली. तडवळे ग्रामपंचायत मधील पराभवामुळे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला. शिरढोण या मोठ्या ग्रामपंचायतीवर चिठ्ठीच्याद्वारे आमदार महेश शिंदे यांनी आपला सरपंच निवडून आणला आणि कोरेगाव तालुक्यातील एका मोठ्या ग्रामपंचायतची सत्ता राष्ट्रवादीकडून ताब्यात घेतली.

    कनेर खेड, आसरे, चांदवडी, वेलंग, त्रिपुटी या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. उर्वरित बहुतांशी ग्राम पंचायतीवर आमदार महेश दादा शिंदे यांनी वर्चस्व मिळवले..