खटाव उत्तर मधील ग्रामपंचायतीवर आमदार महेश शिंदे गटाचे वर्चस्व

खटाव उत्तर मधील बुध नवलेवाडी काटेवाडी व पुसेगाव झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार महेश शिंदे गटाने वर्चस्व राखून या चार झालेल्या ग्रामपंचायतीवर सरपंच पदाचे उमेदवार निवडून आणले व आपले वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.खटाव तालुक्यातील बहुचर्चित बुध ग्रामपंचायतीवर अभयसिंह राजे घाडगे यांच्या नेतृत्वाखालील आमदार महेश शिंदे गटाचे वर्चस्व सरपंच आणि दहा सदस्य शिंदे गटाचे निवडून आले.

    वर्धनगड  : खटाव उत्तर मधील बुध नवलेवाडी काटेवाडी व पुसेगाव झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार महेश शिंदे गटाने वर्चस्व राखून या चार झालेल्या ग्रामपंचायतीवर सरपंच पदाचे उमेदवार निवडून आणले व आपले वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.
    खटाव तालुक्यातील बहुचर्चित बुध ग्रामपंचायतीवर अभयसिंह राजे घाडगे यांच्या नेतृत्वाखालील आमदार महेश शिंदे गटाचे वर्चस्व सरपंच आणि दहा सदस्य शिंदे गटाचे निवडून आले. नवलेवाडी ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठी असलेल्या रोहिणी दीपक पवार यांना 270 मते मिळाली व विजयी झाल्या विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे पवार रोहिणी दत्तात्रेय, शिंदे दुर्गादेवी हनुमंत, पवार धनाजी जिजाबा, शिरतोडे रूपाली युवराज, निकम शहाजी श्रीरंग,पवार निकिता सचिन, पवार दीपक गणपत
    काटेवाडी- कारंडे शुभांगी प्रवीण 195 कचरे मंदाकिनी शामराव 195सरपंच पदासाठी असणाऱ्या दोन्ही महिलांना समान मते मिळाली चिट्टी द्वारे आमदार महेश शिंदे गटाच्या कारंडे शुभांगी प्रवीण या विजयी झाल्या.

    पुसेगाव – पुसेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी आरक्षित असलेल्या अनुसूचित जातीच्या पुरुष या एकमेव जागेसाठी शिवाजी वार्ड क्रमांक एक मधून सरपंच पद रिक्त झालेल्या जागेवर श्री सेवागिरी नागरी जनशक्ती संघटना पॅनलचे घनश्याम शंकर मदने यांना 428 मते मिळवून विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी श्री सेवागिरी रयत संघटनेचे सूर्यकांत राजाराम मसने यांना 417 मते मिळाली बुध,नवलेवाडी, काटेवाडी, व पुसेगाव या खटाव उत्तर मधील चारही जागेवर आमदार महेश शिंदे गटाचे( शिवसेना शिंदे गट ) सरपंच पदी असलेले उमेदवार विजयी झाले. या विजयामुळे आमदार महेश शिंदे गटाची सरशी झाली असून, आमदार शशिकांत शिंदे गटाला विचार करण्याची व भविष्यामध्ये या भागाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये चर्चिले जात होते.