चांदवडी पुनर्वसनमध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या गटाची सत्ता; काँग्रेसचा केला पराभव

वाई तालुक्यातील चांदवडी पुनर्वसन या गावात राष्ट्रीय काँग्रेसचे नेते जयदीप शिंदे (Jaydeep Shinde) यांची सत्ता होती. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांच्या विचाराच्या पॅनेलने सत्ता खेचून आणत विजय मिळवला आहे.

    वाई : वाई तालुक्यातील चांदवडी पुनर्वसन या गावात राष्ट्रीय काँग्रेसचे नेते जयदीप शिंदे (Jaydeep Shinde) यांची सत्ता होती. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांच्या विचाराच्या पॅनेलने सत्ता खेचून आणत विजय मिळवला आहे. सरपंचपद हे यापूर्वीच राष्ट्रवादीच्या गटाकडे बिनविरोध निवड करण्यात गटाला यश आले होते.

    सरपंचपदी फरीद शेख या असून, सात जागासाठी झालेल्या निवडणूकीत मतमोजणीवेळी अजितदादा गटाचे आमदार मकरंद पाटील यांच्या विचारांचे पॅनेलचे पाच उमेदवार निवडून आले तर दोन उमेदवार हे काँग्रेसचे निवडून आले. विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीचे रामदास पांडुरंग शिंदे १०४ मते, रेखा संतोष शिंदे १११ मते, स्नेहल अमोल शिंदे १२४ मते, संतोष जनार्दन शिंदे १०२ मते, यमुना सर्जेराव काकडे १०१ मते यांचा विजय झालेला आहे. तर काँग्रेसचे माजी सरपंच जयदीप शिंदे आणि उज्वला गोरवे हे दोनच उमेदवार निवडून आले.

    राष्ट्रवादीने सत्तांतर केल्यामुळे आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका, किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी पॅनेलचे अभिनंदन केले.