nitesh rane

याकूब मेमनने (Yakub Memon) निरपराध लोकांचा जीव घेतला. मुंबईतील ९३ च्या बॉम्बस्फोटामध्ये मुंबई वाचवण्याचं काम हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी केले होते. त्यांचाच मुलगा मुख्यमंत्री असताना मुंबई बॉम्बस्फोटातील याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरणाच काम करण्यात आलं, असं वक्तव्य आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलं आहे.

    सिंधुदुर्ग : याकूब मेमन (Yakub Memon) हा मुंबई आणि देशाचा गुन्हेगार आहे. तो १९९३ च्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आहे. अशा व्यक्तीच्या कबरीचं सुशोभिकरण मुंबई महानगरपालिका आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नेतृत्व असलेलं सरकार तेव्हा करत असेल, तर याला थेट जबाबदार उद्धव ठाकरे आणि त्यांची मुंबई महानगरपालिका (BMC) आहे, असं वक्तव्य आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane) यांनी केलं आहे.

    याकूब मेमनने निरपराध लोकांचा जीव घेतला. मुंबईतील ९३ च्या बॉम्बस्फोटामध्ये मुंबई वाचवण्याचं काम हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. त्यांचाच मुलगा मुख्यमंत्री असताना मुंबई बॉम्बस्फोटातील याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरणाच काम करण्यात आलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याकुब मेमनच्या कबरीचे सुशोभिकरणं झालं असेल तर त्याला उद्धव ठाकरेचं थेट जबाबदार असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे.

    संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे. स्वत:ला हिंदुत्ववादी समजणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी देशाला आणि राज्याला मुंबईच्या गुन्हेगाराला मोठं करण्याचं काम का केलं ? या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. याकुब मेननच्या कबरीच्या सुशोभिकरणाप्रकारणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे,असं राणे यांनी म्हटलं आहे.