आमदार नितेश राणेंची मतदारांना धमकी? ‘आमच्या विचारांचा सरपंच निवडून नाही दिला तर निधी देणार नाही’, या वक्तव्यामुळं नितेश राणे होताहेत टिकेचे धनी, विरोधक म्हणाले ‘हे’ तर…

सध्या ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे, प्रत्येक उमेदवार आपआपल्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करत आहे. पण कोकणात मत मिळविण्यासाठी चक्क मतदारांना धमकी दिल्याचे चित्र पाहयला मिळाले. भाजपा आमदार नितेश राणेंनी ‘आमच्या विचारांचा सरपंच निवडून नाही दिला तर निधी देणार नाही’ असं वक्तव्य करत मतदारांना धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळं त्यांच्यावर टिका होत आहे.

    कणकवली – सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची जोरदार धामधुम आहे. राज्यातील अनेक भागात 18 डिसेंबरला ग्रामपंचायत निवडणुका होताहेत. गावात तटागटाचे आणि नातेगोत्यांचे राजकारण असते. तसेच भावकी व गावकीचे राजकारण देखील पाहयला मिळते, दरम्यान गाव करील ते राव काय करील अशी म्हण या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने समोर येत आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे, प्रत्येक उमेदवार आपआपल्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करत आहे. पण कोकणात मत मिळविण्यासाठी चक्क मतदारांना धमकी दिल्याचे चित्र पाहयला मिळाले. भाजपा आमदार नितेश राणेंनी ‘आमच्या विचारांचा सरपंच निवडून नाही दिला तर निधी देणार नाही’ असं वक्तव्य करत मतदारांना धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळं त्यांच्यावर टिका होत आहे.

    दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्गातील नांदगावात येथे आले होते. यावेळी आपल्या उमेदवाराचा प्रचार करतेवेळी व मतदारांशी संवाद  साधतेवेळी ते म्हणाले की, सरपंचपदाला न्याय देईल असा उमेदवार आम्ही दिला आहे. केवळ नामधारी उमेदवार दिला नाही. गावाचा विकास करेल, गरज पडल्यास माझ्याशी बोलेल. राणे साहेबांशी बोलेल, अशी व्यक्ती आम्ही उमेदवार म्हणून दिली आहे. नांदगाव हे महामार्गालगत गाव आहे. त्यामुळे साईड रोड बनेल तेव्हा दोन्ही बाजूंना विकास होईल. तेव्हा येथे आपल्या विचारांचा सरपंच असणं आवश्यक आहे. त्यामुळं आमच्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर गावाला एक रुपयाचा निधी मिळू देणार नाही, अशी धमकी आमदार नितेश राणेंनी दिली आहे. त्यामुळं राणेंवर विरोधकांनी टिका केली असून, मत मागण्यासाठी ही अशी कोण धमकी देते का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.

    पुढे बोलताना राणे म्हणाले की, आपल्या विचारांचा सरपंच निवडून दिला नाही तर विकास होणार नाही, निधी येणार नाही. जिल्हा नियोजन, ग्रामविकास, २५:१५ निधी असो किंवा केंद्र सरकारचा निधी असो. मी सत्तेत असलेला आमदार आहे. पालकमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असोत किवां मुख्यमंत्री असोत मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आमच्या विचारांचा सरपंच निवडून द्या अशी धमकी नितेश राणेंनी मतदारांना दिली आहे.