MLA Patel called on MP Supriya Sule to resolve the Melghat issue permanently

आमदार राजकुमार पटेल यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी मेळघाट विधान सभा क्षेत्रामधील अनेक विषयांवर चर्चा करून मेळघाटातील कुपोषण, बाल-मृत्य, माता-मृत्यू याबाबत माहिती घेतली.

    अमरावती : मुंबई स्थित विधान भवन येथे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन, मेळघाटातील विविध समस्याबाबत माहिती दिली. यावेळी मेळघाटातील समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासंदर्भात चर्चा झाली.

    २० जून रोजी विधान भवनात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला आ. राजकुमार पटेल पोहोचले. मतदान केल्यानंतर आमदार राजकुमार पटेल यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी मेळघाट विधान सभा क्षेत्रामधील अनेक विषयांवर चर्चा करून मेळघाटातील कुपोषण, बाल-मृत्य, माता-मृत्यू याबाबत माहिती घेतली. या प्रश्नावर कायम स्वरुपी कसा काय तोडगा काढता येईल याविषयी चर्चा करण्यात आली.

    तसेच मेळघाटातील महिला सशक्तीकरण, महिला बचत गटाच्या सशक्तीकरण करीता करावयाच्या उपाययोजना, याबाबत शासनस्तरावर काय करता येईल याबाबत सविस्तर चर्चा केली. भविष्यात आपण अमरावती जिल्ह्यातील सुरेखा ठाकरे यांच्यासह मेळघाटातील विषयांवर चर्चा व मार्ग काढण्यासाठी माझ्याकडे मुंबईला या आपण सावकाश बसून चर्चा करून मेळघाटातील कुपोषण बाल-मृत्यू माता-मृत्यू याबाबत उपाययोजना करण्याबाबत चर्चा करु, असे निमंत्रण खा.सुप्रियाताई सुळे यांनी आ.राजकुमार पटेल यांना दिले.

    @MP Supriya Sule_officeSS

    @MLA Rajkumar Patel_officeRP