आमदार प्रसाद लाड यांना पुन्हा शाळेत शिक्षण घेण्याची गरज – विनोद पाटील

आमदार प्रसाद लाड यांना पुन्हा एकदा शाळेत शिक्षण घेण्याची गरज असल्याची टीका विनोद पाटील यांनी केली आहे.

    औरंगाबाद : आज रविवार चार डिसेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील (Coordinator of Maratha Kranti Morcha Vinod Patil) यांनी आमदार प्रसाद लाड यांच्यावर टीका (Criticism on MLA Prasad Lad) केली असून, प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात (Chhatrapati Shivaji Maharaj was born in Konkan) झाल्याचे वक्तव्य केले.

    या वक्तव्याचा निषेध करत आमदार प्रसाद लाड यांना पुन्हा एकदा शाळेत शिक्षण घेण्याची गरज असल्याची टीका विनोद पाटील यांनी केली आहे. सध्या भाजपच्या आमदारांकडे काहीही काम नसून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात वक्तव्य करण्यात येत असून याचा निषेध मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

    प्रसाद लाड यांनी वक्तव्य करण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांवरती अभ्यास करण्याची गरज आहे. आज शाळेतल्या कोणत्याही मुलाला विचारले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला तरी तो शिवनेरी किल्ला (Shivneri Fort) सांगेल मात्र भाजपच्या या आमदाराला शाळेत जाण्याची गरज आज आहे अशी टीका विनोद पाटील यांनी केली आहे.