अमरावतीतील उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करा, आमदार रवी राणा यांची मागणी

नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीमधील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिल्याचे समोर आले आहे.

    नागपूर : अमरावतीत नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांची पोस्ट व्हायरल (Post Viral) केल्यानेच उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची हत्या करण्यात आली, असे एनआयएने (NIA) अहवालात स्पष्ट केले. हे प्रकरण दडपण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि यशोमती ठाकूर यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग यांना हे प्रकरण दडपण्याचे आदेश दिले होते, असा आरोप आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणीही आज विधान सभेत केली.

    विधानसभेत लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना बडनेराचे आमदार रवी राणा यांनी उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. रवी राणांनी या प्रकरणाचा तपास फिरवण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस मंत्र्याच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरेंनी हे केल्याचा दावा राणांनी केला आहे.

    नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीमधील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आरोपींनी २१ जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्या लूट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त होत होता. अमरावती शहर पोलीसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.

    कट्टरपंथी टोळीने केलेले दहशतवादी कृत्य असल्याचे एनआयएने आपल्या आरोप पत्रात म्हटले आहे. कोल्हे यांनी कथितपणे धार्मिक भावना दुखवणाऱ्या व्यक्तींची हत्या करून नवीन उदाहरण तयार करण्याचा या कट्टरपंथीय टोळीचे उद्दिष्ट होते. कोल्हे यांनी २१ जून रोजी भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन करणारी सोशल मीडिया पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती.