ravi rana

रवी राणा (Ravi Rana) म्हणाले की, अमरावती पोलिसांनी (Amravati Police) बेपत्ता झालेली तरुणी सापडण्यासाठी काहीही केलेलं नाही. सातारा रेल्वे पोलीस (Satara Railway Police) व सातारा पोलिसांनी (Satara Police) ही मुलगी शोधली असल्याचा दावा आमदार रवी राणांनी केला आहे.

    अमरावती : राजापेठ पोलीस स्टेशन (Rajapeth Police Station) हद्दीतील एक युवती बेपत्ता झाल्यामुळे नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात राडा केला होता. मात्र बेपत्ता झालेली तरुणी अखेर सातारा (Satara) येथे सापडली आहे. त्यानंतर आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

    हे सुद्धा वाचा

    रवी राणा म्हणाले की, अमरावती पोलिसांनी (Amravati Police) बेपत्ता झालेली तरुणी सापडण्यासाठी काहीही केलेलं नाही. सातारा रेल्वे पोलीस व सातारा पोलिसांनी ही मुलगी शोधली असल्याचा दावा आमदार रवी राणांनी केला आहे. अमरावती पोलीस आयुक्त यांचा काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे.

    उद्धव ठाकरे सरकारमध्ये पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी केवळ वसुली केली आहे. वसुली पथक आता देवेंद्र फडणवीस व शिंदे सरकारमध्ये बंद होणार आहे. तसेच लवकरच गणपतीनंतर आरती सिंग यांची उचलबांगडी होईल व नेत्यांची चमचेगिरी आता चालणार नाही अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे.