देवेंद्र फडणवीसांचा ओबीसी-मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न; आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेतील लोकांना पुढे करून ओबीसी-मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. 

    बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेतील लोकांना पुढे करून ओबीसी-मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

    बीड शहरातील राष्ट्रवादी भवनाला मुद्दामहून टार्गेट करण्यात आले. या हल्ल्यामागे सत्तेतील लोक सहभागी असल्याचे सर्वसामान्यात चर्चा आहे. पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद असल्याचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले.

    तसेच आरक्षण प्रश्नावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुद्दामून ओबीसी नेत्यांना पुढे करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय. वास्तविक पाहता जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी प्रश्न सोडवण्याची गरज आहे. अशा प्रकारे सभा घेऊन प्रश्न निर्माण करण्यात त्यांचा हेतू काय आहे? असा सवाल त्यांनी यावेळी केला.