आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा अपघात, आमदार व वाहन चालक सुखरुप

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर मुंबईपासून काही अंतरावर जगताप यांच्या वाहनाची एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. मात्र, सीट बेल्ट लावलेला असल्याने आणि अत्याधुनिक सुरक्षा असलेले वाहन असल्याने जगताप व त्यांचा चालक सुखरूप बचावले आहेत

    मुंबई : नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा आज सकळी भीषण अपघात झाला. पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर मुंबईपासून काही अंतरावर जगताप यांच्या वाहनाची एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. मात्र, सीट बेल्ट लावलेला असल्याने आणि अत्याधुनिक सुरक्षा असलेले वाहन असल्याने जगताप व त्यांचा चालक सुखरूप बचावले आहेत, मात्र दोघांनाही दुखापत झाली आहे.

    दरम्यान, मोठ्या अपघतातून सुखरुप बचावल्यानंतर जगताप पुढे मुंबईला गेले. सकाळपासून त्यांनी कार्यकर्त्यांसोबत तेथे भेटी गाठी आणि कामेही सुरू केली आहेत. जनतेच्या प्रेमामुळे आपण सुखरूप असून नगरच्या नागरिकांना काळजी करू नये, असंही जगताप यांनी म्हटलं आहे.या अपघातात जगताप यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र, सीट बेल्ट आणि सुरक्षा यंत्रणा यामुळे जगताप आणि त्यांच्या चालकाला दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती कळताच पोलीस मदतीला आले. मुंबईला पुढे गेलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून त्यांना मागे बोलवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या वाहनातून जगताप पुढे रवाना झाले.