
पुण्यातील वाहतूककोंडीचा (Pune Traffic Issue) प्रश्न सातत्याने पुढे येत आहे. त्यात चांदणी चौकातील पूल झाल्यापासून त्या पुलावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यातच आता आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनीदेखील व्हिडिओ शेअर करत पुण्यातील वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
पुणे : पुण्यातील वाहतूककोंडीचा (Pune Traffic Issue) प्रश्न सातत्याने पुढे येत आहे. त्यात चांदणी चौकातील पूल झाल्यापासून त्या पुलावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यातच आता आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनीदेखील व्हिडिओ शेअर करत पुण्यातील वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
सत्यजित तांबे यांनी ट्विट करुन ट्रॅफिकच्या समस्येमुळे मागील काही वर्षांत बऱ्याच आयटी कंपन्या पुणे सोडून गेल्या आहेत आणि वाहतूककोंडी बघता शहर विकासाला नियोजनाची जोड देणं, ही प्राथमिक गरज आहे हे स्पष्टपणे दिसत असल्याचं म्हटलं आहे.
ट्विटमध्ये नेमकं काय लिहिलंय?
सत्यजीत तांबे यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात ट्राफिकच्या समस्येमुळे मागील काही वर्षांत बऱ्याच आयटी कंपन्या पुणे सोडून गेल्या होत्या. तरी देखील अजूनही शहरातील ट्रॅफिकचं चित्र तसंच असल्याचं दिसतंय. चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन तर झाले, मात्र परिस्थिती अजून बिकट झालेली दिसतेय, असे सत्यजित तांबे म्हणतात.