औरंगजेबाचे छायाचित्र झळकवणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा; शिवेंद्रराजे कडाडले

छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमच्या सभेत औरंगजेबाचे छायाचित्र काही कार्यकर्त्यांनी झळकवले होते अशी छायाचित्रे झळकवणाऱ्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendra Raje Bhosale) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

सातारा : छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमच्या सभेत औरंगजेबाचे छायाचित्र काही कार्यकर्त्यांनी झळकवले होते अशी छायाचित्रे झळकवणाऱ्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendra Raje Bhosale) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

छायाचित्र प्रकरणावर बोलताना शिवेंद्रसिराजे पुढे म्हणाले, औरंगजेबाने त्याच्या कारकिर्दीमध्ये लाखो हिंदू लोकांची कत्तल केली तसेच महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना मोठा उपद्रव केला अशा औरंगजेबाचे छायाचित्र झळकवून जर त्याचे कोणी उदात्तीकरण करत असेल तर त्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो. अशी छायाचित्रे झळकवणाऱ्यांच्यावर ताबडतोब देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी तमाम महाराष्ट्र जनतेच्या वतीने मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करतो.

महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या जुलमी कारकिर्दीच्या विरोधात मोठा लढा उभारला होता असे असताना एम.आय.एम.च्या कार्यकर्त्यांनी असे औरंगजेबाचे छायाचित्र झळकवणे हे योग्य नाही ज्यांनी असे प्रकार केले असतील तर त्यांनी महाराष्ट्र सोडून इतरत्र निघून जावे महाराष्ट्राची परंपरा ही पुरोगामी सर्वधर्म समभावाची आहे तिथे असे प्रकार होणार असतील तर हे बिलकुल खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.