आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्रालाय समोर आंदोलन करताना आमदार सुनील शेळके पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत आमदार शेळके आक्रमक

    वडगाव मावळ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. आज (31 ऑक्टोबर) उपोषणाचा सातवा दिवस आहे.महाराष्ट्रभरात मराठा आरक्षणाचं आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे.यावेळी आज ( दि १ ) रोजी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्रालया समोर आंदोलन करत असताना मावळचे आमदार सुनील शेळके यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले.

    यावेळी मंत्रालयाच्या पायऱ्यांवर बसून,हातात फलक घेऊन इतरही आमदारांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनात घोषणाबाजी केली आहे दरम्यान आंदोलन तीव्र होत असताना आमदारांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी धरपकड सुरू केली

    मंत्रालयाचे कामकाज आजपासून बंद ठेवू, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आ्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी आमदारांसह सर्वपक्षीय आमदारांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर पोलिसांनी (Police) या मराठा आमदारांना ताब्यात घेतले. त्यामुळे आता सत्ताधारी आमदारांसह विरोधी आमदारांनी आंदोलन केल्याने शिंदे-फडणवीस-पवार सरकारवरील दबाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

    आमदार शेळकेंची प्रचंड आक्रमक भूमिका

    यावेळी आमदार शेळके चांगलेच आक्रमक झालेल पाहायला मिळाले आम्ही आमच्या समाजासाठी भूमिका घेत आहोत. यात चुकीचं काय आहे? आज उचलून नेले तरी उद्या पुन्हा येऊन बसणार आम्हाला ताब्यात घेण्यापेक्षा आरक्षण द्या, असं हे आमदार म्हणाले. यावेळी या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणाबाजी केली. ‘