महाविकास आघाडीची मते फुटली, काँग्रेसचे हंडोरे पराभूत

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषदेचे धक्कादायक निकाल लागले. भाजपचे राम शिंदे (३०), प्रवीण दरेकर (२९), उमा खापरे (२७), श्रीकांत भारतीय (३०), प्रसाद लाड (२८), शिवसेनेचे सचिन अहिर (२६), आमशा पाडवी, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे (२९), रामराजे निंबाळकर (२८) आणि काँग्रेसचे भाई जगताप (२६) हे विजयी झाले असून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे.

    मुंबई : विधान परिषद निकालात (MLC Election) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. अटीतटीच्या लढतीत भाई जगताप (Bhai Jagtap) हे विजयी झाले असून चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला आहे. तर, भाजपला (BJP) पहिल्या पसंतीची तब्बल १३३ मते पडली आहेत. तसेच, राष्ट्रवादीला (NCP) ५७ मते मिळाली असून ६ अपक्षांची मते मिळाली आहेत. शिवसेनेच्याही (Shivsena) पहिल्या पसंतीची ३ मते फुटली आहेत. दरम्यान, भाजपला अधिकची २७ मते मिळाली आहेत.

    राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषदेचे धक्कादायक निकाल लागले. भाजपचे राम शिंदे (३०), प्रवीण दरेकर (२९), उमा खापरे (२७), श्रीकांत भारतीय (३०), प्रसाद लाड (२८), शिवसेनेचे सचिन अहिर (२६), आमशा पाडवी, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे (२९), रामराजे निंबाळकर (२८) आणि काँग्रेसचे भाई जगताप (२६) हे विजयी झाले असून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. त्यांना केवळ २२ मते मिळाली आहेत.

    दरम्यान, भाजपच्या उमा खापरे आणि राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांचे मत बाद ठरवण्यात आले आहे. विधान परिषदेसाठीचे दुपारी पावणेचार वाजेपर्यंत २८५ आमदारांनी मतदान केले. काँग्रेसने भाजप उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे मतमोजणी रखडली होती. मात्र, आधी राज्य निवडणूक आयोग आणि त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आक्षेप फेटाळले. त्यामुळे मतमोजणी दोन तास रखडली.