विधान परिषद निवडणूक: आज मविआची दुपारी पत्रकार परिषद, नाशिक व नागपूरमधील उमेदवारांना पाठिंब्याचा अंतिम निर्णय होणार; या उमेदवारांना…

विरोधी पक्षाच्या उमेदवारांना पाठींबा द्याचा की नाही? तसेच नाशिक व नागपूरमधील कोणत्या उमेदवारांना पाठिंबा द्याचा याबाबतर आज मविआचा अंतिम निर्णय होणार आहे. यासाठी दुपारी मविआची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे.

  मुंबई–  विधान परिषद निवडणुकीसाठी अजून मविआत एकमत झाले नाहीय, त्यामुळं आज पुन्हा बैठव व पत्रकार परिषद होणार आहे. कॉंग्रेसने नाशिक (Congress Nashik) पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi patil) यांनी उध्दव ठाकरे (Udhav thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संपर्क साधला आहे. त्यामुळे यावर आज अंतिम निर्णय होईल अशी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) तसेच मविआतील नेत्यांनी सांगितली आहे. त्यामुळं विरोधी पक्षाच्या उमेदवारांना पाठींबा द्याचा की नाही? तसेच नाशिक व नागपूरमधील कोणत्या उमेदवारांना पाठिंबा द्याचा याबाबतर आज मविआचा अंतिम निर्णय होणार आहे. यासाठी दुपारी मविआची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे.

  आज बैठक त्यानंतर पत्रकार परिषद

  आज शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची बैठक होत आहे, या बैठकीत विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी पाठिंबा देण्याबाबत निर्णय होणार आहे. या बैठकीला तिन्ही पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं नाशिकमध्ये तसेच नागपूरमध्ये कोणाला पाठिंबा द्याचा यावर शिक्कामोर्तब होईल असं बोललं जात आहे.

  नाशिक, नागपूरमध्ये काय?

  दरम्यान, कॉंग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली असताना अर्ज दाखल न केल्यामुळे नाशिकमध्ये पेच निर्माण झाला आहे. आघाडी म्हणून जागा वाटप करताना औरंगाबाद (विक्रम काळे) ही जागा राष्ट्रवादीकडे तर नाशिक कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र, त्यांनी अर्ज भरला नाही. त्यामुळं पक्षाने सुधीर तांबेंवर कारवाई केली आहे. तर त्यांचा मुलगा सत्यजीत तांबेंनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं नाशिकमधला घोळ वाढला आहे. तसेच नाशिकमध्ये शुभांगी पाटील व नागपूरमध्ये कोणाला पाठिंबा मिळणार हे आज स्पष्ट होणार आहे.

  समन्वय आहे…

  हा कॉंग्रेस अंतर्गत प्रश्न आहे त्यात महाविकास आघाडीला गोवण्यात काही अर्थ नाही. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून निर्णय घेतला होता त्याला मी साक्षीदार आहे असे सांगतानाच त्यामुळे महाविकास आघाडीत समन्वय नव्हता हे मी मान्य करणार नाही, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले आहे.

  शंका होती…

  दरम्यान, महाविकास आघाडीतील नेते एकमेकांशी चर्चा करत होते. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाली होती. आताही ते सतत फोनव्दारे संपर्कात आहेत. मात्र नाशिक येथे काहीतरी गडबड आहे याची कुणकुण लागली होती आणि याची कल्पना कॉंग्रेसच्या वरिष्ठांना दिली होती असेही अजित पवार यांनी सांगितले. आम्ही बसून योग्य तो मार्ग काढला होता. मात्र अर्ज न भरल्याने प्रश्न निर्माण झाला आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.