सत्यजित तांबे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार का?; ट्विट करून दिले ‘हे’ संकेत

महाराष्ट्रात नुकतीच विधान परिषदेची निवडणूक (Maharashtra Legislative Election) झाली. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होती ती नाशिक पदवीधर मतदारसंघाची (Nashik Teachers Constituency). या निवडणुकीत काँग्रेसमधून निलंबित झालेले सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.

    अहमदनगर : महाराष्ट्रात नुकतीच विधान परिषदेची निवडणूक (Maharashtra Legislative Election) झाली. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होती ती नाशिक पदवीधर मतदारसंघाची (Nashik Graduate Constituency). या निवडणुकीत काँग्रेसमधून निलंबित झालेले सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यात ते विजयीदेखील झाले आहेत. त्यामुळे त्यांची आगामी राजकीय भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात आता त्यांनी एक ट्विट (Satyajeet Tambe’s Tweet) केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आले आहे.

    सत्यजित तांबे यांनी एक चारोळी ट्विट केली आहे. त्यामध्ये त्यांनी ‘उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी….घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी’, असे सूचक ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्षात परतण्याचे सर्व दोर कापून टाकले आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सत्यजित तांबे यांच्या या ट्विटचे राजकीय वर्तुळातून अनेक अर्थ काढले जात आहेत.

    तांबेंच्या घरवापसीची अप्रत्यक्ष साद

    सत्यजित तांबे यांचे मामा असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी कालच सत्यजित तांबे यांना अप्रत्यक्षपणे घरवापसीची साद घातली होती. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी सत्यजित तांबे यांनी एक ट्विट केले आहे. त्यामधून त्यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा परतण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सूचित केले आहे.

    भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा

    सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही सत्यजित तांबे यांच्यासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता त्यांनी सूचक ट्विट केले आहे.